उठल्या लहरी काही, गेले धुवून सारे
उरल्या खुणा, कधी न पुसण्याजोग्या
स्वच्छ निर्मळ, पाण्यासारखा नागवा
आणि व्याख्या, दृष्ट न लागण्याजोग्या
त्वचेला झाकले हसून, तरी दिसतात
खोल जखमा, कधी न झाकण्याजोग्या
विसरलो सारे, क्षण, वाटा आणि वळणे
प्रत्येक त्या जागा, निवांत बसण्याजोग्या
आता विस्तीर्ण मोकळे, आभाळ एकटे
हरवल्या उमेदी, पंखांत भरण्याजोग्या
उरे आभासी जगातले, आभासी जगणे
अपुऱ्या काही, आठवणी जपण्याजोग्या
..
आयुष्याच्या अडगळीत लपण्याजोग्या !