माणूस बऱ्याचदा निराश झाला , अपयशी झाला की त्याला स्वतःच्या परिस्थिती बद्दल वाईट वाटत असतं. मग तो जगाला, नशीबाला, नियतीला आणि विशेष म्हणजे लोकांच्या नाशीबांना नावं ठेवतो. पण खरं तर दुसऱ्यांना दोष देण्यापेक्षा माणसाने आपले नाकर्तेपण मान्य केलं पाहिजे, आपण आपल्या परिस्थितीचे दास आहोत हे मान्य केलं पाहिजे .. आणि दासांना स्वतःच्या इच्छा नसतात, आकांक्षा नसतात. किड्यांचा जन्म चिरडून मरण्यासाठीच झालेला असतो हेच खरं. त्यांना फक्त अंधारच असतो. कितीही प्रयत्न केला तरी त्यांच्या आयुष्यात प्रकाश येत नाही.. त्यांनी प्रकाशाची अपेक्षा न करणंच योग्य !
अंधार नको असेल तर ..
सर्वत्र प्रकाश करा
प्रकाश हवा असेल तर ..
एक दिवा हाती धरा
ज्योत हवी असेल तर ..
नशिबाची वात करा
ज्वलन हवे असेल तर..
रक्ताचे तेल करा
रक्तही हवे असेल तर..
त्याचेही मोल भरा
पैसा हवा असेल तर..
नियतीचे पाय धरा
तीही हसत असेल तर..
शिव्यांचे श्लोक करा
नीतीलज्जा असेल तर..
तोंड पहिले बंद करा
तोंड बंद असले तर..
दासत्व मान्य करा
हेही झाले असले तर..
इच्छांचा खून करा
विझवून खोट्या ज्योती
पुन्हा सर्वत्र अंधार करा … !
सुंदर!!
Thank you !