तू गेलीस त्या वाटेवर..

कलाकाराला मिळणारा एकांत म्हणजे एक दुधारी तलवार असते .. तो एक मोहपाश असतो ज्याचा मोह सुटत नाही आणि एकदा अडकलो की पुन्हा भौतिक जगात यावस वाटत नाही. एकांत म्हणजे फक्त आजूबाजूला कोणी नसणे नव्हे ही तर एक मनाची अवस्था असते जेव्हा माणूस अंतर्मुख होत असतो. या एकांताची कारण शोधायची असतील तर आधी मनात वाकून पहाव…

काल

प्रेमाच्या पाकळ्या वेचत वेचत माणूस कुणाचा तरी माग काढत ज्या रस्त्यांवरून चालत असतो , ते रस्ते तसे नागमोडी वळणांचे … ओंजळीत साठवलेल्या पाकळ्या हळू हळू सुकून जाऊ लागतात आणि त्यांच्या गंधांच्या आठवणी होऊ लागतात. या तथाकथित प्रेमाच्या अनिश्चित वाटांवर चालताना एका सहचारिणीचा  विसर पडलेला असतो ती म्हणजे वेळ. पावलागणिक लांब आणि धूसर होत जाणाऱ्यां रस्त्यांना…