तो क्या हुवा?

आज हूँ पैरोतले तो क्या हुवा ? आज हैं आँसू जले तो क्या हुवा ? अकेला मैं नहीं मेरी तनहाई मेरे साथ है किसी एक तारे के बस टूटने की बात है आसमाँसे आज हैं फासले तो क्या हुवा ? आज हैं मसले तो क्या हुवा ? थोड़े थोड़े फिसले तो क्या हुवा ? रास्तोंके…

तो थकला होता थोडा!

माझी ही उत्तरं शोधण्याची प्रक्रिया जरी परिचयाची असली तरी ती सोसायला सोपी नव्हे. पण याचा भौतिक जगात काहीही उपयोग नसतो कारण माझ्या उमेदीचा काळ निघून गेलेला असतो, आपलं मनाचं समाधान.. इतकंच. नुसत्या मनाच्या समाधानावर पुन्हा एकदा उमेदीने शोध सुरु करणं म्हणजे तसं कठीणच! तेव्हा माझ्यातच एक नवीन मूक संघर्ष सुरु होतो, एका बाजूला माझं मन आणि एका बाजूला…

फकीर

या माझ्या चालण्या, थांबण्या अडखळण्याच्या परिक्रमेतील अजून एक पडाव म्हणजे फकिराचं कोंदण लाभलेलं क्षणिक वैराग्य. खरं तर वैराग्याचा अर्थ फार मोठा आहे. त्याच्या अनंत पसरलेल्या पाउलखुणांवर वर्षानुवर्ष साचत आलेल्या अध्यात्मिक भस्माला माझ्या सारख्या सामान्य माणसाचा उसासा काय हलवणार? संसारावर, आयुष्यावर प्रेम करायचं असेल तर एकदा तरी वैराग्याची भावना दाटून यावी लागते एकदा तरी फकिराचे फाटके…

वादळ

मनाची अजून एक गमतीशीर गोष्ट म्हणजे हे मन एक घन वस्तू नाही. अनंत तलम, कठोर, कधी पारदर्शक, कधी अर्ध पारदर्शक पटलांचे थर या मनात असतात. पण ही पटले म्हणजे मिटलेल्या फुलाच्या पाकळ्या नव्हे! वेळोवेळी मन एकेक पटलाला आपल्या भोवती गुंडाळत असते आणि म्हणूनच ही पटले आणि फुलाच्या पाकळ्या यांच्यात मुलभूत फरक आहे. प्रत्येक ज्योतीला जशी…

पाचोळा

दिवा लावला की प्रकाश पडणार ! एवढ्या साध्या आणि सुलभ व्याख्येने वादळ आणि त्याच्या परिणामांचे मुल्यांकन करता येत नाही. मनातल्या वादळांची तर गोष्टच निराळी ! मनातलं वादळ म्हणजे फक्त सोसाट्याने वाहणारे विचार किंवा बेभान बरसणाऱ्या भावना नसतात. ते वादळ म्हणजे जीवनरूपी अखंड नदीचा प्रवाह बदलणारा, नैसर्गिक बांध असतो. प्रवाहात वाहताना मनाला दिशांचे भान रहात नाही. त्याला…

मलाही हसायचंय

सुख आणि दुःख एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत .. असं थोरा मोठ्यांचं बोलणं आपण वाचतो , ऐकतो. ज्याच्यासाठी सुख-दुःखातला फरक नष्ट झाला तो स्थितप्रज्ञ हेही आपण मानलेलं आहे. पण स्थितप्रज्ञही स्वतःला आपण सुख-दुःखाला समान मानतो , असं सांगून स्थितप्रज्ञतेच एका अर्थी सुखच उपभोगत असतो ! मग हा फरक कुठे नष्ट झाला ?! याच मुख्य कारण…

दूरदेशीच्या पाखरा

हिशेब ही सुद्धा अजून एक अशीच मजेशीर गोष्ट! कारण हिशेबाचा संबंध गणिताशी येतो.. एका अस्सल भौतिक विश्वाशी येतो. या जगात दोन अधिक दोन चारच होतात, ते जर झाले नाहीत तर हिशेब चुकला हे अगदी नक्की. आयुष्याचा हिशेबासाठी चालू असलेली जुळवाजुळव म्हणजे थोडक्यात आनंदाच्या क्षणांतून दुःखांच्या क्षणांची वजाबाकी. बहुतेकांच्या नशिबात या हिशेबाची बाकी शून्य असते. थोडक्यात आपल्या…

काही गोष्टींना खरच “वय” नसतं!

माझ्या भावनाच्या काही विचित्र अवस्था आहेत.. आधी प्रश्न, मग त्याचं उत्तरं शोधण्याची धडपड, मग थोडे मी आणि थोडे लोकांनी उभे केलेले अडथळे, त्यावर येणारा राग, फार राग येऊन होणारा निरुपाय, निरुपायाने ओढवलेली शांतता आणि कालांतराने प्रश्नच निष्फळ वाटू लागल्यामुळे येणारं करुणात्मक हसू आणि एकदा एखाद्या गोष्टीच हसं झालं की त्याकडे मी त्रयस्थ पणे बघतो आणि खरा प्रश्न समोर…

सार्थक

देवाकडे केलेलं मागणं म्हणजे सरकारी साहेबाला केलेला अर्जच! सगळ्यांना वाटतं की त्यांच मागणं महत्वाचं आहे.. स्वार्थाचा चष्मा थोडा वेळ बाजूला केला तर गीतेतला एक दृष्टांत दिसू लागतो, तो म्हणजे प्रत्येक जीवाचा जन्म एका निश्चित कर्मासाठी झालेला आहे. हे कर्म झाले नाही तर मोक्ष मिळत नाही या भीतीपोटी माणूस आत्महत्या टाळत असतो. याच भीतीपोटी तो आपापले…