हे जरी खरं असलं तरी माझं भावनाकाहूर मन? ते त्याच्या प्रश्नांना उत्तरं मागत असतं. अशा वेळी माणसाला हे जाहीर करावं लागत की तो नास्तिक नाही! एकदा आस्तिक झालं की सगळं देवावर सोपवायला मोकळीक मिळून जाते. तरीही काही झाडे वादळाला झुंजायला तयार होतात, उभी राहतात. काही झाडांच्या फांद्या तुटतात, काहींची फुले वाहून जातात तरीही झाडं उभी रहातात.. पण काही झाडांच्या मुळांनाच धक्का बसतो. तेव्हा आस्तिकतेची ढाल घेऊन देवापुढे हात पसरण्यावाचून काहीच उरत नाही..
तुझ्या दारावर येऊन
कोणी काही मागणं रोजचं आहे,
कधी भक्तीने कधी
निरुपायाने रडण रोजचं आहे
मागणाऱ्याला नसली तरी
देणाऱ्याला लाज असावी,
गतजन्मी राहून गेल जे काही
त्याची तरी जाण असावी
हरवतात सारे
शोधता तुला भावविश्वात
क्षणा क्षणांच्या वेदनांना
मानून घेतात प्रसाद
मी कसा मागू काही
लूटलीस तू पवित्रता द्रौपदीच्या पदराची
अन झाकालीस तिला तू
करून ढाल तिला तिच्याच युद्धाची
खेळ तुझे, नियम तुझे
प्यादी तुझी आणि पट ही तुझे
नेहमीच तुला जिंकवणारे
‘नशीब’ नावाचे कट ही तुझे
भक्त नाही आम्ही तुझे
तू ठरवलेले
पण यातना आहेत आम्हालाही,
हाकेला आमच्या अशी
पाठ फिरवू नकोस,
तुझ्या दारावर पुन्हा
आलाच ‘बावळा’ कोणी
त्यालाही
रिकाम्या हाती पाठवू नकोस!
Rolla, MO (US)