बेमुदत !

तुम्ही आणि मी बोलून काय होणार ?
जोरजोरात रडण्यावर कोणाचीही बंदी नाही
म्हणून तेवढंच करता येतंय … बेमुदत !

कुणाकुणाच्या नाड्या कुठे अडकल्यात ?
तुमच्या आणि माझ्या नरड्या आवळल्यात
म्हणून मरता मरता जगता येतंय … बेमुदत !

ज्याला त्याला स्वातंत्र्य आहे
नव्हे हक्क आहे संप करण्याचा, तोही … बेमुदत !

तुम्हाला आणि मला काही करता येत नाही
हक्क असूनही !
कारण आपली गोदामे भरलेली नाहीत ..
दररोज हातावर पोट घेऊन हमाली करणाऱ्यांनो
तुम्हाला रोज हमाली करावी लागते
हीच तुमची शिक्षा आहे, ती भोगा … बेमुदत !

साध्यासुध्या गोष्टींचा जमाना गेला
आता सगळं काही टोकाला जाउन करावं लागतं
त्याशिवाय कोणीच विचारात नाही !
एका टोकाला आपण … दुसऱ्या टोकाला बंद … बेमुदत !

रस्त्यावरच्या कुत्र्यालाही माहित असतं
कुठल्या दारावर लाळ घोटत जायचं
जाउन जाल कुठे ?
आपणही त्यांच्याच दारावर जाउन उभे रहाणार … बेमुदत !

बंद … बंद … बंद …
या बंद वर कोणीतरी बंदी आणली पाहिजे … बेमुदत !

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *