नाकर्तेपण एक असा शाप आहे जो कोणालाच पचत नाही. आपण नाकर्ते आहोत ही कल्पना देखील मनाला मुळापासुन हादरवून सोडते. आजच्या जगामध्ये (ऐहिक जगामध्ये ) जेवढं नाकर्ते पण आहे तेवढं माणसाने कधीच पाहिलं नव्हतं ! असं गेली अनेक वर्षे अनेक जण सांगत आलेले आहेत. आजही सांगत आहेत.. म्हणजे परिस्थिती बदललेली नाही. कोणी बदलायला गेलाच तर त्याच…
Author: Rohit Bapat
तो थकला होता थोडा!
माझी ही उत्तरं शोधण्याची प्रक्रिया जरी परिचयाची असली तरी ती सोसायला सोपी नव्हे. पण याचा भौतिक जगात काहीही उपयोग नसतो कारण माझ्या उमेदीचा काळ निघून गेलेला असतो, आपलं मनाचं समाधान.. इतकंच. नुसत्या मनाच्या समाधानावर पुन्हा एकदा उमेदीने शोध सुरु करणं म्हणजे तसं कठीणच! तेव्हा माझ्यातच एक नवीन मूक संघर्ष सुरु होतो, एका बाजूला माझं मन आणि एका बाजूला…
फकीर
या माझ्या चालण्या, थांबण्या अडखळण्याच्या परिक्रमेतील अजून एक पडाव म्हणजे फकिराचं कोंदण लाभलेलं क्षणिक वैराग्य. खरं तर वैराग्याचा अर्थ फार मोठा आहे. त्याच्या अनंत पसरलेल्या पाउलखुणांवर वर्षानुवर्ष साचत आलेल्या अध्यात्मिक भस्माला माझ्या सारख्या सामान्य माणसाचा उसासा काय हलवणार? संसारावर, आयुष्यावर प्रेम करायचं असेल तर एकदा तरी वैराग्याची भावना दाटून यावी लागते एकदा तरी फकिराचे फाटके…
वादळ
मनाची अजून एक गमतीशीर गोष्ट म्हणजे हे मन एक घन वस्तू नाही. अनंत तलम, कठोर, कधी पारदर्शक, कधी अर्ध पारदर्शक पटलांचे थर या मनात असतात. पण ही पटले म्हणजे मिटलेल्या फुलाच्या पाकळ्या नव्हे! वेळोवेळी मन एकेक पटलाला आपल्या भोवती गुंडाळत असते आणि म्हणूनच ही पटले आणि फुलाच्या पाकळ्या यांच्यात मुलभूत फरक आहे. प्रत्येक ज्योतीला जशी…
पाचोळा
दिवा लावला की प्रकाश पडणार ! एवढ्या साध्या आणि सुलभ व्याख्येने वादळ आणि त्याच्या परिणामांचे मुल्यांकन करता येत नाही. मनातल्या वादळांची तर गोष्टच निराळी ! मनातलं वादळ म्हणजे फक्त सोसाट्याने वाहणारे विचार किंवा बेभान बरसणाऱ्या भावना नसतात. ते वादळ म्हणजे जीवनरूपी अखंड नदीचा प्रवाह बदलणारा, नैसर्गिक बांध असतो. प्रवाहात वाहताना मनाला दिशांचे भान रहात नाही. त्याला…
मलाही हसायचंय
सुख आणि दुःख एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत .. असं थोरा मोठ्यांचं बोलणं आपण वाचतो , ऐकतो. ज्याच्यासाठी सुख-दुःखातला फरक नष्ट झाला तो स्थितप्रज्ञ हेही आपण मानलेलं आहे. पण स्थितप्रज्ञही स्वतःला आपण सुख-दुःखाला समान मानतो , असं सांगून स्थितप्रज्ञतेच एका अर्थी सुखच उपभोगत असतो ! मग हा फरक कुठे नष्ट झाला ?! याच मुख्य कारण…
तू गेलीस त्या वाटेवर..
कलाकाराला मिळणारा एकांत म्हणजे एक दुधारी तलवार असते .. तो एक मोहपाश असतो ज्याचा मोह सुटत नाही आणि एकदा अडकलो की पुन्हा भौतिक जगात यावस वाटत नाही. एकांत म्हणजे फक्त आजूबाजूला कोणी नसणे नव्हे ही तर एक मनाची अवस्था असते जेव्हा माणूस अंतर्मुख होत असतो. या एकांताची कारण शोधायची असतील तर आधी मनात वाकून पहाव…
काल
प्रेमाच्या पाकळ्या वेचत वेचत माणूस कुणाचा तरी माग काढत ज्या रस्त्यांवरून चालत असतो , ते रस्ते तसे नागमोडी वळणांचे … ओंजळीत साठवलेल्या पाकळ्या हळू हळू सुकून जाऊ लागतात आणि त्यांच्या गंधांच्या आठवणी होऊ लागतात. या तथाकथित प्रेमाच्या अनिश्चित वाटांवर चालताना एका सहचारिणीचा विसर पडलेला असतो ती म्हणजे वेळ. पावलागणिक लांब आणि धूसर होत जाणाऱ्यां रस्त्यांना…
दूरदेशीच्या पाखरा
हिशेब ही सुद्धा अजून एक अशीच मजेशीर गोष्ट! कारण हिशेबाचा संबंध गणिताशी येतो.. एका अस्सल भौतिक विश्वाशी येतो. या जगात दोन अधिक दोन चारच होतात, ते जर झाले नाहीत तर हिशेब चुकला हे अगदी नक्की. आयुष्याचा हिशेबासाठी चालू असलेली जुळवाजुळव म्हणजे थोडक्यात आनंदाच्या क्षणांतून दुःखांच्या क्षणांची वजाबाकी. बहुतेकांच्या नशिबात या हिशेबाची बाकी शून्य असते. थोडक्यात आपल्या…
काही गोष्टींना खरच “वय” नसतं!
माझ्या भावनाच्या काही विचित्र अवस्था आहेत.. आधी प्रश्न, मग त्याचं उत्तरं शोधण्याची धडपड, मग थोडे मी आणि थोडे लोकांनी उभे केलेले अडथळे, त्यावर येणारा राग, फार राग येऊन होणारा निरुपाय, निरुपायाने ओढवलेली शांतता आणि कालांतराने प्रश्नच निष्फळ वाटू लागल्यामुळे येणारं करुणात्मक हसू आणि एकदा एखाद्या गोष्टीच हसं झालं की त्याकडे मी त्रयस्थ पणे बघतो आणि खरा प्रश्न समोर…