आई

जेव्हा कधी मी अशा आईला बघतो की तिची ईच्छा असूनही तिचं बाळ पुढे जाऊ शकत नाही. त्या आईला काय वाटत असेल? कित्येकदा मी हेही पाहिलंय की मुलगा किंवा मुलगी दिव्यांग असते, त्यांना चालत येत नसतं, बोलता येत नसतं, विचार करता येत नसतो आणि आपल्याला काय वाटतंय ते सुद्धा सांगता येत नसतं, तरीही ती म्हातारी आई आपल्या मुलांचा हात धरून त्यांना चालवत असते. कदाचित या वेड्या आशेने की कधीतरी तिचं बाळ इतर मुलांसारखं होईल. असंही दिसतं कधी कधी जेव्हा एखाद्या गरीब आईला तिच्या उघड्या वागड्या मुलांना बघून मनोमन आक्रोष करत असते. त्या सगळ्या आयांना ही कविता समर्पित आणि त्यांना शतशः नमन!

पिलास पंख नचसे
आई करील काय
गर्भात वासरू हरले
दारात हंबरे गाय

शापित तुझ्या कळ्या
अन् वेलीस दोष येतो
आयुष्य हसते आणि
पिंडास कावळा रडतो

दुबळ्या चोचीत वेडे
भरवशी कितीक घास
असेच रडे आभाळ
पाहून वांझ धरणीस




Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *