पांडुरंग हो पाठीराखा
रखुमाई माय जयाची
त्यासी भीती गा कशाची
त्यासी भीती गा कशाची
आम्हा ना ठावे गाव कूळ
ना हो विषयाची जाण
सत्य वाणी हो जयाची
त्यासी भीती गा कशाची
वस्त्रात होई नागवा
त्याने द्यावे हो लांछन
जो धरे कास धर्माची
त्यासी भीती गा कशाची
जाळोनि का सुवर्णे
जाते तेज हो जळून
अणुरेणू साक्ष दिव्याची
त्यासी भीती गा कशाची
waah !
_/\_