Bjp Maharashtra महाराष्ट्र भाजप

महाराष्ट्र भाजप समर्थकांची अगतिकता

भाजप आणि महाराष्ट्र

भाजप पुन्हा एकदा सत्तेत येऊन जवळजवळ अर्धे वर्ष सरले आहे. खरं सांगायचं तर भाजप ने महाराष्ट्रात २०२४ आधी पुन्हा सत्तेत यावं असं मला मुळीच वाटत नव्हतं. अजूनही मला हे पटलेलं नाही. पण तरीही महाराष्ट्र भाजप ने सत्तेत यायचा निर्णय घेतला. का? ते त्यांनाच चांगलं ठाऊक असावं. जेव्हापासून भाजप महाराष्ट्रात सत्तेत आले आहेत तेव्हापासून त्यांना, विकाऊ पत्रकारिता, राजकीय अजेन्डा चालवणाऱ्या वृत्तवाहिन्या आणि पत्रकार यांनी भंडावून सोडलेले आहे. अर्थातच हे उघड आहे की महाराष्ट्र भाजप या सगळ्या आव्हानांना समर्थपणे आणि सामर्थ्याने तोंड देण्यात फार यशस्वी होताना दिसत नाही. इथेच “महाराष्ट्र भाजप समर्थकांच्या अगतिकतेचे मूळ आहे”!

समर्थकांची अगतिकता

महाराष्ट्रातील प्रत्येक, म्हणजे अक्षरशः प्रत्येक भाजप समर्थकाला हे चांगलं ठाऊक आहे की, महाराष्ट्र भाजप आपली बाजू मांडण्यात (narrative building) आणि ठामपणे आपले मत दुसऱ्यांना पटवून देण्यात कमकुवत आहे. विरोधी पक्ष आणि पत्रकार यांनी शिवाजी महाराजांबद्दल भाजप नेत्यांनी केलेल्या विधानांचा आधार घेऊन, निर्माण केलेले वातावरण याचे उत्तम उदाहरण आहे. प्रत्येक भाजप समर्थकाला हे माहित आहे की, मीडिया आणि पत्रकार या वादाला खतपाणी घालत आहेत. प्रत्येक भाजप समर्थक याबद्दल उद्विग्न आहे, नाराज आहे, क्रोधित आहे. पण, महाराष्ट्र भाजप आणि त्यांचे नेते? त्यांचे यावर काय मत आहे?

ही तर फार विशेष बाब आहे की महाराष्ट्रातील भाजप नेते आणि पक्ष, स्वतःवर उठणाऱ्या प्रश्नांना पूर्ण ताकदीने उत्तर देत नाहीत. कधी कधी तर चक्क चर्चाच टाळतात. ते ही स्वतःची चूक नसताना! कमल आहे ना? अनेकदा योग्य गोष्टींसाठी देखील भांडायची मनःस्थिती दिसत नाही. असल्या अजेन्डा प्रेरित घटनांना दिलेली काही उत्तरे तर संपूर्णपणे अनपेक्षित, कचखाऊ आणि नाराज करणारी असतात. माझ्या मते ही वाजपेयीजींच्या काळातील सहिष्णुतेची सावली आहे, जी भाजपच्या नेत्याची “राजकीय लढाऊ वृत्तीपासून दूर राहण्याची मानसिकता” बदलू देत नाहीये. आपणहून फ्रंटफूटवर न गेल्याने, महाराष्ट्र भाजप पक्ष बऱ्याचदा बॅकफूट वर दिसतो. त्यामुळे त्यांच्याबद्दल “महाराष्ट्र भाजप पक्ष, विनाकारण सहिष्णू, सद्गुणविकृतीने ग्रसित, सत्यासाठी रस्त्यावर उतरून लढण्याची वृत्ती न दाखवणारा, बाहुबल नसणारा आणि दाखवू न शकणारा कचखाऊ पक्ष आहे” अशी भावना अनेक समर्थकांच्या मनात आहे. (विश्वास नसल्यास खाजगीत विचारून बघा). दुर्दैवी आहे पण सत्य आहे.

“महाराष्ट्र भाजप पक्ष, विनाकारण सहिष्णू, सद्गुणविकृतीने ग्रसित, सत्यासाठी रस्त्यावर उतरून लढण्याची वृत्ती न दाखवणारा, बाहुबल नसणारा आणि दाखवू न शकणारा कचखाऊ पक्ष आहे” अशी भावना अनेक समर्थकांच्या मनात आहे.

महाराष्ट्र भाजप आणि योगी आदित्यनाथ
योगी आदित्यनाथ यांनी जे कट्टर हिंदू रूप घेतलेले आहे ते महाराष्ट्रातील भाजपच्या एकही नेत्याला घेता आलेले नाही (Image Source)

महाराष्ट्र भाजप चे समर्थक जेव्हा आजूबाजूला अशी उदास व निराशाजनक परिस्थिती बघतात तेव्हा त्यांच्यात “हे योगीजींच्या उत्तर प्रदेश मध्ये चालू दिलं असतं का?“, “जर भाजपचेच ‘ते’ नेते विरोधकांना कडक उत्तर देऊ शकतात, वेळप्रसंगी कारवाई करू शकतात तर महाराष्ट्रातील भाजप नेते असं का करू शकत नाहीत?” अशा चर्चा घडतात. अनेक खल होतात आणि सगळ्या चर्चांचा शेवट, “पण आपल्याला दुसरा पर्याय काय आहे? कारण आपण त्या दुसऱ्या पक्षांना तर मत देऊ नाही शकत!” अशा नकारात्मक वाक्यांवर होतो. त्यामुळे प्रश्न पडतो की, महाराष्ट्रातील भाजप समर्थक, भाजपला पर्याय नाही म्हणून समर्थक आहेत की काय? ही स्वतःचे अवलोकन करायला लावणारी दयनीय अवस्था आहे. अशा प्रकारे किती दिवस मतं मिळणार आहेत?

महाराष्ट्र भाजप आणि सहिष्णुतेची ओढ

भाजपचे कट्टर समर्थक, महाराष्ट्र भाजप पक्षाच्या सर्वधर्मसमभाव, सहिष्णुता आणि लोकशाहीच्या नावाखाली हिंदूंच्या भावनांची पायमल्ली शांतपणे सहन करण्याच्या वृत्तीला विटलेले आहेत. कटु वाटले तरीही, हे सत्य आहे. गरजेपेक्षा जास्त “सबका साथ” समर्थकांना विशेष पटत नाही. वैयक्तिकरित्या माझा सबका साथ, या गोष्टीला विरोध नाही. पण, केवळ या सहिष्णुतेच्या मोहापायी राजकीयदृष्ट्या दुर्बल होण्यात मला काहीही तथ्य वाटत नाही. महाराष्ट्र भाजप चे समर्थक या सर्वधर्मसमभावाला आणि सहिष्णुतेला वैतागलेले आहेत. याचे मुख्य कारण असे की माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगात हेच महाराष्ट्रातील समर्थक योगी जी, हेमंत बिस्वा सर्मा जी यांच्याबद्दल ऐकतात आणि बघतात, जे आपल्या हिंदुत्ववादी विचारांबद्दल आणि आस्थांबद्दल ठाम आहेत, मुखर, प्रखर आहेत.

महाराष्ट्रातील भाजप समर्थकांना योगी जी आणि हेमंत जी यांचे वागणे अत्यंत आवडते. आणि हे बघता त्यांना या गोष्टीची अत्यंत चीड येते, नैराश्य येते की महाराष्ट्र भाजप चे नेते असे वागत नाहीत. उलट ज्या लोकांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर अश्लाघ्य, अश्लील आणि असंस्कृत भाषेत टीका केली, त्या लोकांबरोबर महाराष्ट्र भाजप नेत्यांचे “मैत्रीपूर्ण” संबंध आहेत. ज्या पत्रकारांनी संघ, हिंदू, सनातन धर्म, भारतीय परंपरा यांच्यावर लांच्छन लावण्याची एकही संधी दवडलेली नाही, त्यांना हसत खेळात मुलाखती देतात. समर्थक यामुळे अत्यंत नाराज आहेत. आणि का न व्हावं? तथापि, या नाराजीचे महत्व महाराष्ट्रातील भाजपच्या नेत्यांना समजले आहे असे दिसत तरी नाही.

ज्या लोकांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर अश्लाघ्य, अश्लील आणि असंस्कृत भाषेत टीका केली, त्या लोकांबरोबर महाराष्ट्र भाजप नेत्यांचे “मैत्रीपूर्ण” संबंध आहेत. ज्या पत्रकारांनी संघ, हिंदू, सनातन धर्म, भारतीय परंपरा यांच्यावर लांच्छन लावण्याची एकही संधी दवडलेली नाही, त्यांना हसत खेळात मुलाखती देतात. समर्थक यामुळे अत्यंत नाराज आहेत. आणि का न व्हावं?

भाजप नेत्यांचे “मैत्रीपूर्ण” संबंध

यात मी फक्त भाजपच्या नेत्यांनाच दोष देतो असे नाही. पण एक समर्थक असल्याकारणाने मला भाजपबद्दलच बोलावे लागेल. महाराष्ट्रातील जवळजवळ सगळ्या भाजप नेत्यांचे इतर विरोधी पक्षातील नेत्यांशी आर्थिक, कौटुंबिक नाहीतर व्यावसायिक संबंध आहेत. हेच मुख्य कारण आहे की महाराष्ट्रातील भाजप नेते विरोधी पक्षांशी “दोन हात” करताना कचरताना दिसतात. विरोधी पक्ष्याच्या काही विशिष्ट नेत्यांवर सडकून टीका करताना हात आखडता घेतात. असे करताना हे महाराष्ट्रातील भाजपचे नेते अगदीच लाचार वाटतात. कर्मयोगाबद्दल भाषणे देणारे हेच का ते? अशी देखील शंका येते. असो, नेते काहीही सांगो, लोकांची तर हीच भावना आहे.

केजरीवाल, जेव्हा “सब मिले हुवे हैं” म्हणतो तेव्हा महाराष्ट्रातील लोकांना काही अंशी पटतं. कारण हे खरं आहे. सगळेच भाजप नेते “राजकीय विरोध वेगळा आणि वैयक्तिक मैत्री वेगळी” असे अभिमानाने सांगत स्वातंत्र्यवीर सावरकर, सनातन धर्म, संघ यांच्यावर खालच्या पातळीवर टीका करणाऱ्यांशी देखील मैत्रीपूर्ण संबंध अगदी उघडपणे ठेवतात. खरं सांगा योगी जी, हेमंत बिस्वा जी, अन्नामलाई जी यांनी असले मैत्रीपूर्ण संबंध ठेवलेले – जपलेले कधी बघण्यात आले आहेत का? नाही ना? पण महाराष्ट्रात मात्र असली मैत्री अगदीच नॉर्मल आहे.

महाराष्ट्र भाजपची सामर्थ्यहीनता आणि बाहुबलाचा अभाव

लोकशाही आकड्यांचा खेळ आहे. वाजपेयीजींचे हे वाक्य १०० टक्के सत्य आहे. पण हे आकडे नुसते लोकसभेत, विधानपरिषदेत असून चालत नाही तर रस्त्यावर देखील असावे लागतात. महाराष्ट्रातील भाजप नेते बहुदा हे विसरून गेले आहेत की निव्वळ आमदार आणि खासदारांची संख्या असून राज्य चालत नाही. बरेचसे आमदार पुन्हा निवडून येतील याची खात्री नसते. बाकीच्या पक्षातील आमदारांची देखील ही परिस्थिती असू शकते. पण, महाराष्ट्र भाजपच्या नेत्यांची ही अवस्था बऱ्याच प्रमाणात यामुळे असते की हे आमदार कधी आपले सामर्थ्य, बाहुबल दाखवताना दिसत नाहीत. कुणाला आवडो अगर न आवडो राज्य आणि सत्ता टिकवण्यासाठी, चालवण्यासाठी बाहुबलाची आवश्यकता असते. निर्बल नेता कोणाला आवडतो? आता तुम्ही विचाराल की लोकशाहीत या बाहुबलाचा किंवा रस्त्यावरच्या सामर्थ्याचा काय उपयोग आहे?

सर्वसाधारणपणे भाजप नेत्यांना आणि खासकरून महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी “कडी निंदा” च्या मानसिकतेतून बाहेर येऊन, सत्ता राबवणे आणि विरोधकांच्या कारस्थानांना सामर्थ्यपूर्वक कठोर उत्तर देणे गरजेचे आहे.

जवळजवळ सगळे महाराष्ट्र भाजप समर्थक “भाजप ला ‘सत्ता’ चालवता येत नाही” हे प्रांजळपणे मान्य करतात. कारण त्यांनी ‘सत्ता’ चालवणाऱ्यांचे दिवस पहिले आहेत. आपल्याही नेत्यांनी असे धडाडीने काम करावे हीच आम्हा समर्थकांची इच्छा असते! समजा महाराष्ट्र भाजप सर्वोच्च नेत्यांबद्दल, त्यांच्या कुटुंबियांबद्दल कोणी अश्लील, अश्लाघ्य बोलले, किंवा कोणी काही कडवी टीका केली, किंवा शाई फेकली, तर साधारणपणे या नेत्यांचे काय उत्तर असेल? “कडी निंदा”, “आम्ही या घटनेचा निषेध करतो” किंवा “आमच्या बोलण्याचा विपर्यास केला गेला”. बास्!? नुसतेच मौखिक आश्वासन समर्थकांना अजिबात आवडत नाही. सध्याचीच परिस्थिती पाहा. विरोधक आणि माध्यमांनी उभा केलेला मुद्दा आणि त्याच्यासाठी पुकारण्यात आलेला बंद! यांना सरकारने काय उत्तर दिले? महाराष्ट्र भाजप ने काय उत्तर दिले? जातीयवादी संघटनांच्या उपद्रवाविरोधात महाराष्ट्र भाजपकडे काय उत्तर आहे? काहीच नाही!

या जातीयवादी लोकांना हवा तसा, हवा तेव्हा धुडगूस घालायला रान मोकळे मिळते, त्यांच्यापैकी गुन्हेगार नेते राजरोसपणे नेतेपद मिरवताना दिसतात. हे किती दिवस सुरु राहणार? हा प्रश्न प्रत्येक समर्थक विचारत आहे आणि या दिशेने कुठलेच पाऊल उचलले जात नाही हे पाहून आणखीन नाराज होत आहे. खरं सांगायचं तर भाजप सत्तेत आले की विरोधक, जात्यंध लोक हवे तेव्हा मोर्चे, बंद आणि संप पुकारून राज्याला अस्थिर करू शकतात आणि भाजपचे राज्यकर्ते जनतेला आवाहन करण्यापलीकडे विशेष काहीच करू शकत नाहीत! हेच आत्तापर्यंत दिसून आलेले आहे. पटत नसेल तर “महाराष्ट्रात दंगलखोरांच्या, उपद्रवी लोकांच्या घरांवर बुलडोझर चालू शकतो का?” याचे उत्तर स्वतःला विचारा. या सगळ्या राजकारणात नुकसान सामान्य जनतेचे होते. ज्यांचा या राजकारणाशी सुतराम संबंध नसतो. तीच गत समर्थकांची देखील होते.

निष्कर्ष

माझ्या स्पष्ट बोलण्याने भाजपचे सदस्य नाराज होतील. नेत्यांबद्दल मी साशंक आहे कारण माझ्यासारख्या समर्थकांचे काही लिहिलेले मोठ मोठे नेते वाचत असतील असे काही वाटत नाही. तरीही सत्य सांगणे गरजेचे आहे. महाराष्ट्र भाजप ने स्वतःत आमूलाग्र बदल करणे गरजेचे आहे. सर्वधर्मसमभाव – सहकार यांचे दिवस आता सरले आहेत, हे महाराष्ट्र भाजप चे नेते जितक्या लवकर ओळखतील तितका त्यांना फायदा होईल. समर्थकांना हिंदुत्ववादी, सशक्त, समर्थ, निर्णयक्षम आणि वेळप्रसंगी अत्यंत कठोर नेते सत्तेत बघायचे आहेत, बाहुबलाचे प्रदर्शन करताना बघायचे आहेत. चूक बरोबर याची हवी तेवढी चर्चा करू पण, मला जे सत्य दिसत आहे ते मी सांगितले. आणखीन एक महत्वाची गोष्ट अशी की ज्या दिवशी महाराष्ट्रात “खरोखर” एखादा कट्टर हिंदुत्ववादी गट उभा राहील त्या दिवशी महाराष्ट्र भाजप चे समर्थक त्यांच्या मागे उभे राहतील. तुम्ही कोणाच्या मागे खंबीरपणे उभे राहिलात तरच तुम्ही त्या माणसाकडून समर्थनाची अपेक्षा करू शकता. काही वेळा मी भाजपच्या नेत्यांना सामान्य लोकांना मदत करताना बघितलेले आहे. पण, सामान्यतः भावना हीच आहे की “हे” आपल्याला वाचवणार नाहीत, फक्त निंदा करतील!

“वकील आणि गुंड यांच्या मारामारीत कोण जिंकेल?” या प्रश्नाच्या उत्तरात महाराष्ट्रातील भाजप समर्थकांच्या अगतिकतेचे समाधान दडलेले आहे.

असो, जाता जाता तारिक फतेह यांनी विचारलेला एक अत्यंत मूलभूत प्रश्न मी तुमच्यासमोर मांडतो “वकील आणि गुंड यांच्या मारामारीत कोण जिंकेल?” या प्रश्नाच्या उत्तरात महाराष्ट्रातील भाजप समर्थकांच्या अगतिकतेचे समाधान दडलेले आहे.

कोणाच्या भावना दुखावण्यासाठी मी हे ब्लॉग लिहीत नाही. अर्थातच मला खूप जास्त “आतल्या गोष्टी” माहित नाहीत. जे सत्य मला दिसत आहे ते सांगण्याचा प्रयत्न करतोय इतकंच. एक हितचिंतक म्हणून, समर्थक म्हणून आपल्याच कुटुंबियांचे दोष दाखवून देणे हे माझे कर्तव्य आहे. बाकी माझ्यासारख्या सामान्य माणसाची ही बडबड किती मनावर घ्यायची आणि किती नाही हे मी वाचकांवर व महाराष्ट्र भाजप च्या नेत्यांवर सोडतो.

सभ्य शब्दात मांडलेल्या प्रतिक्रियेचे सदैव स्वागत आहे.. धन्यवाद 🙏

Spread the love

3 thoughts on “महाराष्ट्र भाजप समर्थकांची अगतिकता”

  1. तुम्ही केलेला उहापोह महाराष्ट्र भाजपा ला पुर्ण माहीत आहे आणी एक ताळेबंद उत्तर प्वक्तांकडं असल्यान त्यांना फरक पडत नाही. निवडणुका असोत वा नसोत या लोकांची मदार मोदी-शाह जोडीवर आणी देवाभाउंच्या अचुक एक्झीक्युशनवर तरतेय . भाजपा समर्थक यांना झटका देउ शकत नाहीत कारण त्यात राज्याच आणी पर्यायान राष्टाच हित आहे म्हणुन ही आगतिकता.

    तुम्ही तुमच काम आमच्या भरवश्यावर सुरु ठेवा. भाजपाच्याच कुणा एखाद्याला वाजवायच असेल तर जरुर सांगा.

    जोपर्यंत आक्रमकता महाराष्ट्र भाजपाच्या अंगी येत नाही तोवर थील्लर राष्ट्रवादी, तेलकट शेणके, मुजोर ब्रिगेडी, भिकारचोट कुत्रकार , लाल गांडीचे युट्युबर आणी शिवराळ निळे वंचित आपल्यावर उडतच राहणार यात शंका नाही

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *